विशाल भोसले राजे गटाचे सरपंच पदाचे उमेदवार असतील ?


महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्यानंतर प्रभाग रचना व मतदार याद्यांचा कार्यक्रम पूर्ण होत असताना निवडणूक आयोगाने जिल्हा अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या संदर्भात सूचना केल्याने या निवडणुका लवकरच घेण्यासाठी सगळ्या शासकीय विभागांची लगबग चालू असताना एकीकडे गावागावात मोर्चे बांधणी चालू चित्र स्पष्ट होत आहे 
आता सरपंच पद हे थेट जनतेतून असल्याने प्रत्येक गटा गटाने आपल्या उमेदवारीचे पत्ते बाहेर काढले आहेत मतदारांच्या गाठीभेटी मतदारांची चाचपणी वार्डनिहाय  संख्याबळ व मतदारांचा कौल इत्यादी गोष्टी जाणून घेण्यासाठी आता प्रत्येकाची तयारी चालू असताना 
साखरवाडी ग्रामपंचायतची निवडणूक ही अटीतटीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट प्रत्यक्ष निवडणुकी वेळी होईलच 
येथे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेना राजे गट यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार असल्याचे बोलले जात आहे किंवा गावामध्ये तिसरी आघाडी होणार किंवा नाही याबाबत ही शंका कुशंका काढण्यात येत असताना राजे गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवारासाठी काही नावे पुढे येत असताना यामध्ये वार्ड क्रमांक सहा मधून विशाल भोसले यांनी आपली उमेदवारी जाहीर करून टाकली  असल्याची तशी स्पष्ट भूमिका सध्या तरी घेतल्याचे दिसत  असताना अचानकपणे या वार्डमधील सर्वसाधारण पुरुषांचे आरक्षण बदलण्यात आले तेथे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण पडले असताना विशाल भोसले यांनी सरपंच पदासाठी तयारी दर्शवली तर वावगे ठरणार नसल्याचे येथील युवक शक्तींकडून विचार मांडले जात आहेत पक्ष पाठबळ आणि राजकीय ताकद पाठीशी असल्यास विशाल भोसले यांना ही निवडणूक सोपी जाईल असेही काहींचे म्हणणे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post