माणसांच्या गर्दीत अनेक चेहरे भेटतात काही चांगले काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करून राहणारे आणि सर्वांना आनंदी आनंद देणारे असे व्यक्तिमत्त्व म्हणजे आमचा मित्र डॉक्टर आनंद जाधव यांचा आज वाढदिवस असून मनामनाला आनंद देणारा हा आनंद म्हणजे डॉक्टर आनंद जाधव
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून इथपर्यंतचा प्रवास करणारा मित्र संघर्षातून कसं जगायचं ते त्याच्याकडूनच शिकावं अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेऊन समाजात मानसन्मान प्रतिष्ठा जपून आपल्या संपूर्ण कुटुंबाला पुढे घेऊन जाणारा हा आनंद परिवारासाठी आधारस्तंभच म्हणावे लागेल कठीण परिस्थितीत कसं जगावं ते शिकवणारा हा आनंद दुःखात सुद्धा सुख मानून आपल्या मित्र परिवाराला सतत हसतमुख ठेवणारा हा आनंद म्हणजे डॉक्टर आनंद जाधव
आई-वडिलांनी घालून दिलेल्या संस्काराच्या शिदोरीवर आपल्या कुटुंबातील सर्वांच्यावर चांगले संस्कार करून त्यांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण देऊन पुढे घेऊन जाणारा हा आमचा मित्र म्हणजे डॉक्टर आनंद जाधव होय
जेव्हा भेटतो तेव्हा मी त्याच्या विनोदी शैलीमुळे माझे सुखदुःख विसरून जातो डॉक्टर आनंद याचा स्वभाव म्हणजे अत्यंत मनमोकळेपणाने बोलणारे व्यक्तिमत्व सर्वांना हवे हवेसे वाटणारे असे त्याचे व्यक्तिमत्व हसत खेळत जीवन जगणारे सामाजिक राजकीय क्षेत्राशी सतत संलग्न राहून फलटण तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा हा डॉक्टर आनंद जाधव साखरवाडीच्या ग्रामपंचायतीवर आपल्या वहिनींच्या माध्यमातून सरपंच पदाच्या वाटेवर हळुवारपणे पाऊल ठेवणारा हा आनंद आणि त्याचे ते व्यक्तिमत्व म्हणजे दुधामध्ये साखरच म्हणावी लागेल डॉक्टर आनंद जाधव यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे होळ खामगाव मुरूम पिंपळवाडी जिंती फडतरवाडी खराडेवाडी पाच सर्कल आणि या परिसरातील वाड्या रस्त्यावर इत्यादी ठिकाणी ग्रामीण परिसरामध्ये आपल्या पशुवैद्यकीय क्षेत्रातून दूध उत्पादक शेतकरी कुटुंबांना नेहमी सहकार्य करणारा हा सलोख्याचे विश्वासाचे नाते निर्माण करणारा असे त्याचे व्यक्तिमत्व प्रत्येक घराघराशी एक चांगले कौटुंबिक आणि घट्ट संबंध आणि नाते निर्माण करणारा त्याचा स्वभाव असे त्याचे एकंदर व्यक्तिमत्व प्रत्येकाला भावून जाते
आपला पशुवैद्यकीय व्यवसाय सांभाळून सामाजिक आणि राजकीय क्षेत्राशी सतत संपर्क ठेवणारा गावाच्या मातीशी नाळ जपणारा गावाच्या प्रत्येक घडामोडीमध्ये सहभागी राहणारा हा आनंद प्रत्येकाच्या जीवनाचा आनंद बनवून राहिला आहे
साखरवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच विक्रमसिंह भोसले यांचा अत्यंत जवळचा आणि विश्वासू असा मित्र म्हणून त्यांची ओळख आहे म्हणूनच तर विक्रमसिंह भोसले यांनी आनंद डॉक्टर यांच्या घरामध्ये सरपंच पदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिली होती आणि ती त्यांनी खंबीरपणे सांभाळूनही दाखवली सुद्धा
डॉक्टर आनंद जाधव यांचा मोठा मित्रपरिवार आहे आणि अनेक पशुवैद्यकीय डॉक्टर व त्यांचे जवळचे संबंध आहेत आपल्या वैद्यकीय संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे कार्यक्रम त्यांनी राबवलले दूध उत्पादक शेतकऱ्यांना वेळोवेळी चांगले मार्गदर्शन ही त्यांच्याकडून मिळत असते रात्री अपरात्री अखंडपणे पशुवैद्यकीय क्षेत्रात त्यांची ही सेवा अखंडपणे चालू असते
त्यांच्या अफाट मित्रपरिवार बरोबरच साखरवाडीतील जीवाभावाचे मित्र म्हणजे त्यांचे जवळचे श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन शाहूराजे भोसले त्याचबरोबर डॉक्टर विक्रमसिंह खानविलकर एस के भोसले आणि सोबत काकासो भोसले असा त्यांचा हा मित्रपरिवार एकनिष्ठतेने कायम बरोबर असतो अपयशाने खचून न जाणारा आनंद जीवनाच्या वाटेवर अविरतपणे सफर करणारा जाताजाता सर्वांची मने जिंकणारा असा हा आनंद म्हणजे डॉक्टर आनंद जाधव यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन त्यांना पुढील आयुष्य सुखासमाधानाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो .
पत्रकार किसन भोसले
संपादक सातारा सूर्य
Tags
sakharwadi