राज्य शेती महामंडळाच्या चौदा ऊस मळ्यातील कामगारांचा पुणे मुख्य कार्यालयावर १७ मार्च रोजी भव्य मोर्चा धडकणार
साखरवाडी : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या चौदा ऊस मळ्यातील कामगार सेवानिवृत्त कामगार व त्यांचे वारसदार यांच्या प्रलंबित मागण्यास महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगार लढा कृती समितीचे वतीने येत्या सतरा मार्च रोजी पुणे येथील राज्य शेती महामंडळाच्या मुख्य कार्यालयावर प्रचंड मोर्चा घेऊन जाऊन कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाग पाडू अशी रोखठोक भूमिका महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगार लढा कृती समितीचे सरचिटणीस सुभाष कुलकर्णी यांनी घेतली आहे सुभाष कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील चौदा ऊस मळ्यातील हजारो कामगार सेवानिवृत्त कामगार मयत कामगार यांचे वारस या मोर्चात सहभागी होणार आहेत गेल्या महिनाभरापासून मोर्चा संदर्भात चौदा ऊस मळ्यातील कामगारांच्या बैठका संवाद साधून जनमत तयार करण्यात आले
मोर्चात पुढील मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे सन 2002 सालच्या माजी मंत्री रामराजे निंबाळकर यांचे शिफारशी प्रमाणे व मा उच्च न्यायालयामध्ये दिलेल्या राज्य सरकारचे प्रतिज्ञापत्र प्रमाणे व कायद्यातील तरतुदीनुसार कामगारांना दोन गुंठे जागा देऊन घरे बांधून देण्याची राज्य सरकारने व महामंडळाने उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे मान्य केले असताना चोवीस वर्षे झाली तरी अद्याप शेती महामंडळाच्या चौदा ऊस मळ्यातील नऊ हजार कामगारांना दोन गुंठे जागा देऊन सरकार घरे बांधून देत नाही गेल्या चाळीस पन्नास वर्षांपासून कामगार चाळीत खोल्यांत व झोपड्यांमध्ये रहातात कामगार वसाहतीचे चौदा मळयाचे क्षेत्र आठशे एकोणतीस एकर आहे वसाहतीच्या क्षेत्रावर तरी सरकारच्या व शेती महामंडळाच्या प्रतिज्ञापत्र प्रमाणे दोन गुंठे जागा देऊन घरे बांधून देण्यात यावीत महाराष्ट्र सरकारने पंधरा नऊ दोन हजार नऊ रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार अद्यापही कामगारांच्या हक्काच्या देय रक्कमा चौथा पाचवा व सहावा वेतन आयोग सेवा उत्पादन फरक समान कामास समान वेतन इत्यादी 81कोटी 16लाख देयके देण्यासाठी शेती महामंडळातील कामगारांच्या व न्याय हक्कासाठी न्यायालयीन मार्गाने मागण्या मंजूर मार्गाने मागण्या मान्य करून घेतल्या नंतर शेती महामंडळाचे अधिकारी उच्च न्यायालयात अपील दाखल करतात मा औद्योगिक न्यायालय अहिल्यानगर यांनी रोजंदार कामगारांना सेवा उत्पादन समान कामास समान वेतन रिटरेचमेंट कॉम्पेशन देण्याचे आदेश दिले त्या विरोधातही मा उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले त्यामुळे वर्षानुवर्षे मागण्या कामगारांच्या बाजूने निर्णय होऊनही कामगारांना न्याय मिळत नाही प्रातिनिधिक संघटना व समिती गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून शेती महामंडळाच्या कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत पाठपुरावा करत आहे पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने कामगारांच्या असलेल्या विविध मागण्यांवर तडजोडीचा प्रस्ताव पाठवला होता सदरचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगार लढा कृती समितीने 29.9.2024रोजी दिलेला असून प्रस्ताव देऊन 18महिने होऊनही अद्याप राज्य सरकारने व शेती महामंडळाने कामगार प्रश्नावर तडजोड केलेली नाही प्रस्ताव स्वीकारून त्यावर तडजोड न करणं हे कामगारांवर अन्यायकारक आहे या सर्व न्याय मागण्यासाठी शेती महामंडळ चौदा ऊस मळ्यातील हजारो कामगारांनी येत्या सतरा मार्च रोजी पुणे येथे शेती महामंडळाच्या मुख्य कार्यालयावर धडक मोर्चा त सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्या दिवशी चतुर्शिंगी मंदीराचे पटांगणावर हजर राहून तेथून मोर्चा दुपारी बारा वाजता निघेल मोर्चात आपल्याकडील पारंपरिक वाद्ये प्रत्येक ऊस मळयाचा फलक घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे मोर्चाला येणार्या कामगारांची नोंद करुन जे कामगार मोर्चात सहभागी होतील अशा कामगारांची नोंद केली जाणार आहे व त्यांच्या साठी दोन गुंठे जागा व घरे बांधून देण्यासाठी व देय रक्कमा मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील याची नोंद कामगारांनी घ्यावी असे महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगार लढा कृती समितीचे वतीने कळवण्यात आले आहे
Tags
Sakharwadi