कृषीकन्यांनी Fyllo कंपनी मार्फत दिली कृत्रीम बुद्धीमते बद्दल माहिती

     कांबळेश्वर, ता . बारामती येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय ,  फलटण येथील कृषीकन्यांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औदयोगिक जोड प्रकल्प २०२५ - २६  कार्यक्रमांतर्गत कांबळेश्वर येथे महादेव मंदिरात ऊस उत्पादन‌वाढी साठी कृत्रीम बुद्‌धीमतेबद्‌दल माहिती दिली.

हा कार्यक्रम FYLLO कंपनीचे  प्रक्षिकक्षकांनी आयोजित केला होता यामध्ये त्यांनी पीक वाढीसाठी तयार करण्यात आलेल्या मॉडेल  सादरीकरण करून शेतकऱ्यांना माहिती दिली. यामध्ये त्यांनी मॉडेल चे फायदे व वापर सांगितले तसेच हवामान अंदाज, मातीची स्थिती व पीकांसाठी लागणारी पाण्याची गरज याबद्दल योग्यप्रकारे प्रशिक्षण दिले.                                        बदलत्या काळानुसार होणारा कृत्रीम  बुद्धिमत्तेचा  वापर शेतीत कसा करावा याबद्‌दल प्रशिक्षण दिले. जिवोदया प्रोजेक्ट मार्फत FYLLO कंपनीच्या मार्गदर्शन लाभले.
    या कार्यक्रमासाठी कृषी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. यु.डी चव्हाण कार्यक्रम समन्वयक प्रा. एन. एस धालपे, कार्यक्रम आधिकारी प्रा.एन.ए.पंडित, कार्यक्रम अधिकारी प्रा.एस. एम. साळुंखे, तसेच ‌डॉ प्रा. जी. बी. अडसुळ यांचे कृषीकन्या कुमारी श्रावणी गायकवाड, विजया दिवाणे, प्राजक्ता जाधव, शितल जाधव, अपूर्वा जगताप, श्रुतिका  जगताप व वृषाली कदम यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post