विजयाचे प्रतीक म्हणून प्रशांत रणवरे संभाजी जाधव यांच्याकडून विक्रम आप्पांना चांदीची गदा प्रधान


विजयाचे प्रतीक म्हणून प्रशांत रणवरे संभाजी जाधव यांच्याकडून विक्रम आप्पांना चांदीची गदा प्रधान 
सातारा जिल्हा परिषद फलटण पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या उमेदवार कुमारी शिवांजली विक्रमसिंह भोसले या फलटण तालुक्यात विक्रमी मतांनी निवडून येण्याची खात्री या दोन्ही कार्यकर्त्यांना निकाला आधीच झाली होती त्यांनी खास करून पुण्याहून रातोरात चांदीची गदा अगोदरच आणून ठेवली होती 
 आणि निकाल ही तशाच पद्धतीने लागल्याने याच निवडणुकीच्या निकालानंतर साखरवाडी मध्ये कुमारी शिवांजली विक्रमसिंह भोसले यांच्या विजयाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या जंगी मिरवणुकीमध्ये साखरवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच पै. विक्रमसिंह भोसले यांना प्रशांत रणवरे व संभाजी जाधव या त्यांच्या कार्यकर्त्यांनी बजरंगबलीचे व निवडणुकीच्या विजयाचे प्रतीक म्हणून विक्रमसिंह भोसले यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना प्रथमतः अभिवादन करून ही गदा प्रधान केली यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post