साखरवाडी प्रतिनिधी : लायन्स क्लब फलटण संचलित लायन्स मुधोजी चॅरिटेबल हॉस्पिटल यांच्या वतीने खामगाव येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश वारे यांचे चिरंजीव शिववर्धन योगेश वारे यांच्या वाढदिवसानिमित्त खामगाव येथे मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे
या शिबिरामध्ये रुग्णांची मोफत व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार असून शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत खामगाव येथील भैरवनाथ मंदिर या ठिकाणी या शिबिराचे आयोजन केले आहे
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील इच्छुक नेत्र रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन योगेश वारे व कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags
phaltan