कांबळेश्वर येथे गावच्या प्रोफाईल विषयी गावनेत्यांसोबत कृषीकन्यांनी केली गटचर्चा.


बारामती तालुक्यातील कांबळेश्वर  येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीकन्यांनी 'ग्रामीण जागरुकता कृषि कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प 2025-26 कार्यक्रमांतर्गत   विद्यार्थ्यांनी गावचे सामाजिक, आर्थिक व भौगोलिक चित्र समजून घेण्यासाठी गावातील प्रमुख नेत्यांसोबत गटचर्चा आयोजित केली. या गटचर्चेमध्ये गावचा इतिहास, लोकसंख्या, पाणीपुरवठा, शेती व्यवस्था, शासकीय योजनांची अंमलबजावणी, तसेच ग्रामीण भागातील अडचणी व विकासाच्या संधी यावर सखोल चर्चा झाली. गटचर्चेत सरपंच, उपसरपंच, सदस्य, उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी नोंदी घेऊन गावाच्या प्रोफाईलसाठी आवश्यक माहिती संकलित केली. या उपक्रमामुळे गावातील समस्या समजून घेण्यास मदत झाली असून भविष्यातील विकास आराखडा तयार करताना ही माहिती उपयुक्त ठरेल, असे मत सहभागी नेत्यांनी व्यक्त केले. यासाठी कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य  डॉ. यु. डी. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य  डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा . निलिमा धालपे,कार्यक्रम अधिकारी प्रा. नितिशा पंडित व प्रा. सुरेश साळुंखे, व डॉ . प्रा.गणेश अडसूळ यांचे  कृषीकन्या कुमारी श्रावणी गायकवाड, विजया दिवाणे, प्राजक्ता जाधव,शितल जाधव, अपूर्वा जगताप, श्रुतिका जगताप व वृषाली कदम यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post