कांबळेश्वर, ता. बारामती येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविदयालय, फलटण येथील कृषीकन्यांनी ग्रामीण जागरुकता कृषी ककार्यानुभव व औदयोगिक जोड प्रकल्प २०२५-२६ कार्यक्रमांतर्गत कांबळेश्वर येथे ठिबक सिंचनाद्वारे खते देण्याचे प्रात्यक्षिक दिले.
कृषीकन्यांची यावेळी ठिबकसिंचनाद्वारे खत देण्याची प्रक्रिया समजावली. त्यामध्ये सिंचन प्रणालीची कार्यपद्धती व त्याद्वारे खत देण्याचे फायदे आणि अंमलबजावणी याबाबत सविस्तर माहिती दिली. कृषीकन्यांनी ठिबक सिंचनाच्या सहायाने पाण्याची व खताची बचत या गोष्टींची ही माहिती दिली.
शेतकऱ्यांनी या प्रात्यक्षिकास उत्स्फुर्त सहभाग नोंदवला व ठिंबक सिंचनाद्वारे खत देण्याची तयारी दर्शवली .
या कार्यक्रमासाठी कृषी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. यु.डी चव्हाण कार्यक्रम समन्वयक प्रा. एन. एस धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा.एन.ए.पंडित, कार्यक्रम अधिकारी प्रा.एस. एम. साळुंखे, तसेच डॉ प्रा. जी. बी. अडसुळ यांचे कृषीकन्या कुमारी श्रावणी गायकवाड, विजया दिवाणे , प्राजक्ता जाधव, शितल जाधव, अपूर्वा जगताप, श्रृतिका जगताप व वृषाली कदम यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.