जुन्नर:
जुन्नर तालुक्याच्या इतिहासात नोंद होईल असा आगळावेगळा विवाह सोहळा आळेफाटा येथील साईलीला मंगल कार्यालय मध्ये नुकताच पार पडला
जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील उद्योजक वर पिता सोपान दुरगुडे यांनी कॅन्सर मुक्त भारत अभियान मध्ये सहभाग घेऊन कॅन्सर रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या 30 66 लक्ष्मीतरूच्या वृक्षांची भेट आलेल्या सर्व नातेवाईक पाहुण्यांना देऊन समाजापुढे खूप मोठा आदर्श दिला
वातावरणातील होणारा सततचा बदल आणि त्यामुळे वाढणारे तापमान यामुळे या पुढील काळामधील जीवन जगणे सोपे नाही मात्र वाढत्या तापमानाला रोखण्यासाठी खारीचा वाटा म्हणून आपण काहीतरी केले पाहिजे या उद्देशाने सोपान दुरगुडे आणि सुरेश दुरगुडे यांच्या कुटुंबामध्ये चर्चा होऊन गुगल वरती सर्व माहिती घेऊन शेवटी बहुउपयोगी असणाऱ्या लक्ष्मी तरु वृक्षाची निवड करण्यात आली व मुलीच्या विवाह सोहळ्यामध्ये आपण वृक्ष वाटत तसेच लागवडीसाठी आवाहन करू असे ठरल्याने या विवाह सोहळ्याला आगळे स्थान प्राप्त झाले.
नुसती झाडे लावून जगवने सोपे नसते यासाठी ही झाडे लावल्यानंतर वर्षभर ती जगून त्याचे फोटो वर्षभरानंतर काढावेत आजच्या विवाह सोहळ्याचे वर प्रथमेश आणि वधू सपना यांचा विवाह सोहळा पार पडला .
प्रथमेश आणि सपना यांच्या विवाह सोहळा संपन्न होण्यापूर्वी या दाम्पत्याने लक्ष्मीतरू वृक्षाचे पाणी घालून पूजन केले तर आर्ट ऑफ लिविंग चे टीचर आणि कॅन्सर मुक्त भारत अभियान चे प्रभाकर जगताप यांनी विवाह सोहळ्यामध्ये लक्ष्मी तरु वृक्षाची आरोग्यदायी गुण आणि फायदे सांगितले याच विवाह सोहळ्याच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमांमध्ये एक विशेष लकी ड्रॉ काढण्यात येणार असून लक्ष्मीतरु वृक्ष जगवणाऱ्यास एक चांगल्या प्रकारच्या 11 सायकली भेट देणार असल्याचेही वर बाप सोपान दुरगुडे यांनी स्टार महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले .
या विवाह सोहळ्यातील महाराष्ट्रभरातून तसेच पुणे जिल्हा जुन्नर तालुका संगमनेर तालुका चाकण परिसर एमआयडीसीतील मोठमोठे नामांकित उद्योजक पिंपरी पेंढार तसेच सोपान दुरगूडे यांच्या नातेवाईकांनी मित्रपरिवार मोठ्या संख्येने या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित होता आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची प्रेरणा इतरांनी घेऊन वृक्ष लागवड चे महान कार्य हाती घ्यावे असे आवाहन अनेक मान्यवरांनी यावेळी केले.
या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने प्रमुख मान्यवर आमदार शरददादा सोणवणे यांनी भ्रमध्वनी वरण शुभेच्छा दिल्या तर पारनेर तालुक्याचे आमदार काशिनाथ दाते,विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, विघ्नहर सह.साखर का .संचालक मा. रामदास शेठ वेठेकर.
माऊली शेठ खंडागळे,पिंपरी पेंढारच्या सरपंच सुरेखा ताई वेठेकर, शिवसेना शेतकरी संघटनेचे जुन्नर तालुका प्रमुख जयसिंग पोटे,पत्रकार गणेश पोटे यांच्यासह नागरिक आप्तेष्ट नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते
लग्न सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक गणेश मोढवे आणि सुप्रिया मोढवे यांनी केले.
