महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषीकन्यांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प कार्यक्रमांतर्गत कांबळेश्वर ता. बारामती येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोगी असणारे व बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण करण्यासाठी वापरण्यात येणारे बोर्डो मिश्रण तयार करण्याचे प्रात्यक्षिक दिले. यादरम्यान स्वतंत्र द्रावणे तयार करून मोरचुदाचे द्रावण चुन्याच्या द्रावणात मिसळणे तसेच तयार द्रावण आम्लधर्मी नाही याची खात्री करणे आवश्यक आहे याबद्दल माहिती दिली. तसेच बोर्डो मिश्रण नेहमी ताजे तयार करून वापरावे. कारण ते जास्त काळ साठवून त्याची कार्यक्षमता कमी होते हे चांगल्या प्रकारे समजावून सांगण्यात आले. यासाठी कृषी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. एन. एस. ढालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एन. ए. पंडित व प्रा. एस. एम. साळुंखे तसेच प्रा. जी बी.अडसूळ व विषय शिक्षक प्रा. पी.व्ही. भोसले यांनी कृषीकन्या कुमारी श्रावणी गायकवाड, विजया दिवाणे, प्राजक्ता जाधव, शितल जाधव, अपूर्वा जगताप, श्रुतिका जगताप व वृषाली कदम यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.
