*धनंजय (दादा ) साळुंखे पाटील यांचा सुरवडी गणातून उमेदवारी अर्ज दाखल*

भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरवडी पंचायत गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम आज फळटण तहसील कार्यालयात मोठ्या उत्साहात व जनसमर्थनाच्या वातावरणात पार पडला. भाजपाचे अधिकृत उमेदवार श्री. धनंजय (दादा) साळुंखे-पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकाऱ्यांकडे सादर केला.

यावेळी त्यांच्या सोबत वाठार–निंबाळकर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्री. विष्णुपंत लोखंडे तसेच वाठार–निंबाळकर गणाच्या उमेदवार सौ. शिवांगी तुकाराम शिंदे उपस्थित होते. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला ठाम पाठिंबा व्यक्त केला.

गेल्या अनेक वर्षांपासून श्री. धनंजय (दादा) साळुंखे-पाटील यांनी सुरवडी व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रामाणिक व लोकाभिमुख कार्य केले आहे. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांनी रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत तसेच लोकांमधील वाढता विश्वास पाहता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.

“सुरवडी पंचायत गणाचा विकास हाच आमचा ध्यास असून सर्वसामान्यांच्या हितासाठी पारदर्शक व गतिमान प्रशासन देण्याचा निर्धार आहे,” असे मत श्री. साळुंखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

आगामी निवडणुकीत सुरवडी पंचायत गणामध्ये भाजप व महायुतीचा विजय निश्चित असून विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post