वडजल येथे मान्यवर व युवकांनी केला भाजपमध्ये प्रवेश


लोकप्रिय मा. खासदार श्री. रणजितसिंह (दादा) नाईक निंबाळकर, जेष्ठ नेते श्री. प्रल्हादराव साळुंखे (तात्या) तसेच अमरसिंह (भैया) नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद वाठार-निं गटाचे उमेदवार श्री. विष्णुपंत (आण्णा) लोखंडे व पंचायत समिती सुरवडी गणाचे उमेदवार श्री. धनंजय (दादा) साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वडजल येथील अनेक मान्यवर व युवा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
यामध्ये योगेश ढेंबरे (मा. उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य), धायत्री पिसाळ (विद्यमान ग्रामपंचायत सदस्य), सचिन पिसाळ (मा. उपसरपंच), महादेव ढेंबरे (मा. उपसरपंच), मल्हारी ढेंबरे, किरण बाळासाहेब ढेंबरे, माणिक ढेंबरे (नाना), विशाल ढेंबरे, राजू ढेंबरे, अजय ढेंबरे, गणेश ढेंबरे, प्रसाद ढेंबरे, ओंकार ढेंबरे, सुभाष ढेंबरे, श्रावण ढेंबरे, सागर ढेंबरे, तुषार ढेंबरे, संदीप भगवान ढेंबरे, पंकज ढेंबरे, संग्राम ढेंबरे, सचिन शरद ढेंबरे, संदीप ढेंबरे, अशोक मगर, विष्णू जाधव, सागर पिसाळ, दिनेश पिसाळ, तसेच उजवीकडील यादीतील शेखर पिसाळ, प्रशांत पिसाळ, सुनील पिसाळ, नाना रिटे, आप्पा साहेबराव पिसाळ, सचिन मांढरे व स्वप्निल पवार यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
या प्रसंगी वडजल येथील सर्व भाजप कार्यकर्त्यांनी कोणताही भेदभाव न ठेवता सर्वांना सोबत घेऊन संघटितपणे पक्षवाढीसाठी काम करण्याचे आश्वासन दिले. युवा व अनुभवी कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश हा भाजप पक्षासाठी बळकटी देणारा ठरणार असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये उमेदवारांचे हात अधिक मजबूत होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
आज सर्वांनी मिळून घेतलेला निर्णय हा भाजप पक्षाच्या वाढीसाठी व अधिकृत उमेदवारांना विजय मिळवून देण्यासाठी निश्चितच महत्त्वाचा ठरणार आहे. यापुढेही सर्व कार्यकर्ते एकमताने, एकविचाराने व नव्या उमेदीने पक्षासाठी कार्यरत राहतील, असे यावेळी ठामपणे सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post