*साखरवाडी वार्ताहर*
बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीकन्यांनी 'ग्रामीण जागरुकता कृषि कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प 2025-26 कार्यक्रमांतर्गत कृषी कन्यांनी चारा बनविण्याचे प्रात्यक्षिक राबविले.
त्यांनी कडबा, मीठ व गुळाचा वापर करून जनावरांसाठी चारा बनविला. या चाऱ्यामुळे जनावरांची पचन क्षमता वाढते त्याचबरोबर उत्पादनात वाढ होते. कृषीकन्यानी
शेतकऱ्यांना संपूर्ण प्रकिया करूनही दाखवली. याच सोबत या चाऱ्याचे फायदे व तोटे ही सांगितले. या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यू.डी.चव्हाण व उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी.निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा.एन.एस.धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एन . ए.पंडित व प्रा.एस .एम. साळुंखे , डॉ.प्रा.जी.बी.अडसूळ, विषय शिक्षक प्रा.स्वप्निल लाळगे यांचे कृषीकन्या कुमारी श्रावणी गायकवाड, विजया दिवाणे, प्राजक्ता जाधव,शितल जाधव, अपूर्वा जगताप, श्रुतिका जगताप व वृषाली कदम यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.