केवळ सत्ता मिळवणे हा हेतू न ठेवता, लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आणि संकटात जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे ते एक ‘लोकधुरंधर’ नेते आहेत. राजवाड्याच्या भिंतींच्या पलीकडे जाऊन आधुनिक फलटण आणि प्रगत सातारा घडवण्याचे स्वप्न पाहणारे आणि ते प्रत्यक्षात उतरवणारे त्यांचे व्यक्तिमत्व आहे.
राजकीय चिखलफेकीच्या काळातही आपली वैचारिक पातळी आणि भाषेचा दर्जा राखणारे, संयम हेच त्यांचे सर्वात मोठे शस्त्र आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करताना त्यांनी सरकारी यंत्रणेवर आपली पकड निर्माण केली, ज्यामुळे विकासकामे कागदावरून जमिनीवर उतरली. राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून ते समाजाच्या सेवेचे साधन आहे, हा उदात्त वारसा ते समर्थपणे पुढे चालवत आहेत. राजघराण्यातील वैभव असूनही, सामान्य कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची त्यांची वृत्ती त्यांना ‘आपला माणूस’ बनवते.
मुळातच रक्तात असलेली मुत्सद्देगिरी, न्यायप्रियता आणि प्रजाहितदक्षता हे गुण त्यांना वारशाने मिळाले आहेत. शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण भागातील शेवटच्या घटकाचे प्रश्न नेमके काय आहेत, याची त्यांना खोलवर जाण आहे. शेतीला उद्योगाची जोड देऊन ग्रामीण अर्थव्यवस्था कशी बळकट करता येईल, यावर त्यांचा नेहमीच भर राहिला आहे. एकूणच श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे परंपरा आणि आधुनिकता यांचा एक सुवर्णमध्य सांधणारे नेतृत्व आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणूकीकरीता त्यांना शुभेच्छा.
लेख:' *डाॅ विश्वनाथ हिरानाथ चव्हाण* कन्सल्टंट फिजिशियन एमबीबीएस एम डी मेडिसिन
MBBS MD MEDICINE
Tags
Phaltan