साखरवाडीत प्रल्हाद पाटलांचे वर्चस्व कायम

 किसन भोसले 
साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्स या कारखान्यावर प्रल्हादराव साळुंखे पाटलांनी बरेच वर्ष सत्ता गाजवली असताना सुरवडी व्हाया साखरवाडी पंचक्रोशी मध्ये एक निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून या होळ‌ पिंपळवाडी साखरवाडी जिंती खुंटे फडतरवाडी भिलकटी निंभोरे मुरूम खामगाव इत्यादी गावा गावात पाटलांचे कार्यकर्ते अजूनही तितक्याच ताकतीने प्रल्हादराव पाटलांच्या मागे कायम उभे असताना पाहायला मिळत आहेत त्यात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून प्रल्हादराव पाटलांचे हात आणखीनच बळकट झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे नुकत्याच झालेल्या फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रल्हादराव पाटलांनी आपला करिष्मा दाखवून दिला असल्याची चर्चा असताना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली असून साखरवाडी जिल्हा परिषद गटातून प्रल्हादराव साळुंखे पाटील कुणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असल्याने तशी चर्चा गावागावात व साखरवाडी बस स्थानकावरून रंगू लागली आहे एवढेच नव्हे तर साखरवाडी मध्ये भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते नुकतेच प्रल्हादराव पाटलांच्या माध्यमातून झाले आहे यातून पाटलांची राजकीय ताकद अजूनही तितक्याच जोमाने या भागात टिकून असल्याचे दिसत आहे प्रल्हाद पाटलांची एन्ट्री ज्या ज्या वेळी साखरवाडी मध्ये होते त्या त्यावेळी कार्यकर्त्यांचा गराडा अजूनही तितक्या जमाने बघायला मिळत असतो त्यात शंकाच नाही.

Post a Comment

Previous Post Next Post