साखरवाडी प्रतिनिधी : आज बुधवार दि. २२/०७/२०२६ रोजी सरदार वल्लभभाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज साखरवाडी किमान कौशल्य विभाग येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रशालाचे प्राचार्य गोपाळराव जाधव सर यांनी अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक रवींद्र टिळेकर यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या सामाजिक व राजकीय जीवनाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कार्यक्रमासाठी पत्रकार किसन भोसले , प्रशालेचे शिक्षक , शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे मराठी विभागाचे प्रमुख टिळेकर सर यांनी केले. प्रशालेतील क्रीडा विभागाचे प्रमुख नानासो तांबे सर यांनी कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
Tags
Sakharwadi