आनंद वार्ता! यंदा मान्सून लवकर येणार; १८ ते २५ मे दरम्यान पावसाचे आगमन होणार
एप्रिलमध्ये उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांनी बेजार झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक वार्ता आहे. नवीन संकेतानुसार मान्सून गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही मे अखेरीस डेरेदाखल होण्याची सुखद वार्ता मिळत आहे. युरोपीयन मध्यम श्रेणी हवामान अंदाज केंद्राने (ECMWF) नवीन अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, मान्सून अगोदर अंदमान-निकोबार बेटावर धडकेल. येत्या १८ ते २५ मे या कालावधीत पावसाचे आगमन होईल. एकीकडे महाराष्ट्रातच नव्हे, देशाच्या अनेक भागांत तापमान ४०-४४ डिग्रीपर्यंत पोहचले आहे. उत्तर, मध्य आणि पूर्वोत्तर भारत उष्णतेच्या लाटेत होरपळला आहे. तर अल-निनोमुळे यंदा मान्सून लांबण्याचा आणि पाऊस उशिरा येण्याचा दावा करण्यात येत होता. परिणामी शेतकऱ्यांसह सरकारही चिंतेत आले होते.
Tags
Sakharwadi