सदाबहार आनंद.. डॉक्टर आनंद जाधव

सदाबहार आनंद
माणसाच्या गर्दीत अनेक चेहरे भेटतात काही चांगले काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करून राहणारे आणि सर्वांना आनंदी आनंद देणारे 
 असे व्यक्तिमत्व म्हणजे आमचा मित्र डॉक्टर आनंद जाधव यांचा आज वाढदिवस असून मनामनाला आनंद देणारा हा आनंद म्हणजे डॉक्टर आनंद जाधव 
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून इथपर्यंतचा प्रवास करणारा मित्र संघर्षातून कसं जगायचं ते त्याच्याकडूनच शिकावं अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेऊन समाजात मानसन्मान प्रतिष्ठा जपून आपल्या संपूर्ण कुटुंबाला पुढे घेऊन जाणारा हा आनंद परिवाराला कठीण परिस्थितीत कसं जगावं ते शिकवणारा हा आनंद दुःखात सुद्धा सुख मानून आपल्या मित्र परिवाराला सतत हसतमुख ठेवणारा हा आनंद म्हणजे डॉक्टर आनंद जाधव 
 आई-वडिलांनी घालून दिलेल्या संस्काराच्या शिदोरीवर आपल्या कुटुंबातील सर्वांच्या वर चांगले संस्कार करून त्यांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण देऊन पुढे घेऊन जाणारा हा आमचा मित्र म्हणजे डॉक्टर आनंद जाधव जेव्हा भेटतो तेव्हा मी माझे सुखदुःख विसरून जातो डॉक्टर आनंद याचा स्वभाव म्हणजे अत्यंत मनमोकळेपणे बोलणारे सर्वांना हवेहवेसे वाटणारे असे व्यक्तिमत्व सतत हसत खेळत जीवण जगणारे सामाजिक राजकीय क्षेत्राशी सतत संलग्न राहून फलटण तालुक्यात त आपली वेगळी ‌ओळख निर्माण करणारा हा डॉक्टर आनंद जाधव साखरवाडीच्या ग्रामपंचायतीवर आपल्या वहिनींच्या माध्यमातून सरपंच पदाच्या वाटेवर हळुवारपणे पाऊल ठेवणारा हा आनंद त्याचे ते व्यक्तिमत्व म्हणजे दुधामध्ये साखर...
 डॉक्टर आनंद जाधव यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे होळ खामगाव मुरूम पिंपळवाडी जिंती फडतरवाडी खराडेवाडी पाच सर्कल आणि या परिसरातील वाड्यावर इत्यादी ठिकाणी ग्रामीण परिसरामध्ये आपल्या पशुवैद्यकीय क्षेत्रातून दूध उत्पादक शेतकरी कुटुंबांना नेहमी सहकार्य करणारा आणि सलोख्याचे श्वासाचे नाते निर्माण करणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व प्रत्येक घराघराशी एक चांगले कौटुंबिक आणि घट्ट असे नाते निर्माण करणारे व्यक्तिमत्व आपला व्यवसाय सांभाळून सामाजिक आणि राजकीय क्षेत्राशी सतत संपर्क ठेवणारा गावाच्या प्रत्येक घडामोडी मध्ये सहभागी राहणारा असा हा आनंद प्रत्येकाच्या जीवनाचा आनंद बनून जातो 
साखरवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच विक्रमसिंह भोसले यांचे ते खास मित्र म्हणून सगळीकडे ओळख आहे विक्रमसिंह भोसले यांचा अत्यंत विश्वासू असा मित्र म्हणूनही त्यांची ओळख आहे म्हणूनच तर विक्रमसिंह भोसले यांनी आनंद डॉक्टर यांच्या घरामध्ये सरपंच पदाची धुरा संभाळण्याची जबाबदारी दिली होती आणि ती त्यांनी खंबीरपणे सांभाळून दाखवली सुद्धा‌
    डॉक्टर आनंद जाधव यांचा मोठा मित्रपरिवार आहे अनेक पशुवैद्यकीय डॉक्टर त्यांचे जवळचे संबंध आहेत आपल्या वैद्यकीय संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे कार्यक्रम त्यांनी राबवली दूध उत्पादक शेतकऱ्यांना वेळोवेळी चांगले मार्गदर्शन ही त्यांच्याकडून मिळत असते रात्री अपरात्री अखंडपणे पशुवैद्यकीय क्षेत्रात त्यांची ही सेवा चालू असते 
   अफाट मित्रपरिवार बरोबरच साखरवाडीतील जीवाभावाचे मित्र म्हणजे श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन नितीन शाहू राजे भोसले त्याचबरोबर डॉक्टर विक्रमसिंह खानविलकर एस के भोसले काकासाहेब भोसले रुपेश खानविलकर
  अपयशाने खचून न जाणारा असा हा आनंद जीवनाच्या वाटेवर अविरतपणे सफर करणारा जाता जाता सर्वांची मन जिंकणारा असा आनंद म्हणजे डॉक्टर आनंद जाधव यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन त्यांना पुढील आयुष्य सुखा समाधानाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 
       ------------------  पत्रकार किसन भोसले 
                                 साखरवाडी 
        

Post a Comment

Previous Post Next Post