जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली असली तरी फलटण तालुक्यातील साखरवाडी जिल्हा परिषद गटातील रस्त्यांच्या संदर्भात जनता खूपच नाराज असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे साखरवाडीला जोडणारे चारही बाजूंचे रस्ते अत्यंत खराब अवस्थेत झाल्यामुळे जनता रस्त्यांच्या कामावर उदासीन असताना दिसत आहे मागील वर्षांमध्ये गावाला जोडणारे रस्ते झाले ते एका वर्षात त्यांची दुरावस्था झाली असल्याचे नागरिक बोलत आहेत जिकडे जावे तिकडे रस्त्यांचा मुद्दा उपस्थित होत असल्याचे चित्र स्पष्ट होतं असताना निवडणूक जिंकून येणाऱ्या उमेदवाराने केवळ रस्ते सुधारण्याचे काम केले तरी खूप चांगले होईल अशी अपेक्षा मतदार व्यक्त करत आहेत.
Tags
Satara
